वेदनादायी..
चिमुकलीचा टाक्यात पडून करून अंत
🔸मजरा येथे हळहळ
वणी : संतोष बहादुरे
वणी तालुक्यातील मजरा येथे संडासच्या टाक्यात पडून साडेपाच वर्षीय चिमुकलीचा करून अंत झाल्याची दुर्देवी घटना आज शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.खुशी रामा आत्राम असे मृतक चिमुकलीचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार , मजरा येथील सुनील देवाळकर यांच्या नवीन घराचे काम सुरू आहे .घराचे कामावर चिमुकलीचे वडील व काका सातत्याने कामावर असतांना चिमुकली नियमित यायची.अशातच आज चिमुकली नजरचुकीने नवीन घरी आली याची कल्पना कोणालाच आली नाही.मात्र खुशी आज आली नसल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली.अखेर उशिरा सायंकाळच्या सुमारास संडासच्या टाक्यात खुशी मृतावस्थेत तरंगताना आढळल्याने एकच हंबरडा फुटला.दरम्यान या दुर्देवी घटनेने मजरा येथे शोककळा पसरली आहे.