मारेगाव :- येथील राज्यमहामार्गांवरील एका बिअरबार मध्ये असलेल्या कामगाराला जिवंत विद्युत स्पर्श होवून जागीच ठार झाल्याची घटना आज दि. 22 मे रोजी दुपारी घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. गणेश गणपत मेश्राम (28)रा. पेंढरी ता. मारेगाव असे मृतकाचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसापासून मारेगाव करणवाडी रस्त्यालगत असलेल्या एका बिअरबार मध्ये गणेश हा कामगार म्हणून कार्यरत होता. आज गुरुवार ला दुपारी 12 वाजताचे सुमारास बार समोर असलेल्या संरक्षण जाळीला स्पर्श होताच जाळीला चिकटला. सहकार्यानी खुर्चीच्या सहाय्याने जाळीबाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. तात्काळ रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.