मॉर्निंग ब्रेकिंग..
अखेर तब्बल ४० तासानंतर युवकाचा मृतदेह गवसला
🔸रामपूर युवकाचे तलावातील मृत्यू प्रकरण
🔸शोध घेणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन पथकालाही आले होते अपयश
🔸रामपूरवासी शोकमग्न
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रामपूर येथील युवकाचा मागील गुरुवारला तलावात बुडून मृत्यू झाल्यानंतर तब्बल ४० तासानंतर मृतदेह आज सकाळी बाहेर निघाल्याचे निदर्शनास आले.तलावाच्या तिरावरून येथील नागरिकांनी मृतक बापूजी या युवकास बाहेर काढले.परिणामी वेदनादायक घटनेने रामपूर परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
रामपूर येथील अमोल टेकाम , अतुल मेश्राम व बापूजी भाऊराव आत्राम या तीन मित्रांनी गावालगतच्या तलावात गुरुवारला दुपारी मासे पकडण्यासाठी तलावात जाळे टाकले.जाळे टाकून बाहेर निघत असतांना अचानक बापूजी आत्राम (२५) हा युवक तलावात बुडाला आणि गाळात फसला.मात्र दोन मित्रांना बाहेर निघण्यास यश आले.
सदर घटनेचे गांभीर्य पाहून प्रशासनाने बुडालेल्या युवकास शोधण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले.शुक्रवारला दिवसभर पथकाने शर्थीचे प्रयत्न केले मात्र बापूजी यास बाहेर काढण्यात किंबहुना शोध घेण्यास अपयश आले.
रामपूर येथील नागरिकांच्या धीरगंभीर मनाची कालवाकालव होत असतांना आज शनिवारला सकाळी बापूजीचा मृतदेहच तलावाच्या तीरावर आल्याचे निदर्शनास आले.मागील दोन दिवसांपासून शोकमग्न झालेल्या नागरिकांसह कुटूंबियांनी मृतदेह बघताच एकच हंबरडा फोडला.परिणामी भाऊराव आत्राम यांचा बापूजी हा एकुलता एक मुलगा होता.विवाहित मुलगी असतांना आईवडिलांच्या आयुष्याच्या मावळत्या वर्षात आधारवड कायम विसावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान मृतक बापूजी यास उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव रुग्णालयात आणण्याच्या हालचाली सुरू आहे.