शहरात गेल्या काही महिन्या पासुन मनोरंजन क्लबच्या नावावर जुगार अड्डा सुरु आहे. सुरु असलेला मनोरंजन क्लबच्या नावाखालील जुगार अड्डा लाखो रुपये उलाढालीचे केंद्रस्थान असुन येथे दुर,दुरुन जुगार शौकीन आपली हौस पुर्ण करीत आहे. दिवसा पेक्षा रात्रपाळीत हा खेळ मोठ्या प्रमाणात फोफावलेला असुन मोठ्या शहरातुन येथे रात्री ला शौकीन मुक्कामी येत आहेत.मुक्कामी असलेल्या शौकीनासाठी स्पेशल मेजवानी दिली जात असुन येथे त्यांचे चोचले पुरविण्याची काळजी घेतली जात आहे. या अड्यावर रात्र पाळीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असुन आशिर्वाद कुणाचा?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जुव्वेका पैसा नगद
खेळासाठी टोकन सिस्टम वापरले जात असुन या टोकनची किंमत ठरलेली आहे. त्यामुळे येथे प्रत्यक्ष रुपये दिसत नसले तरी रुपयाचे संकेत असलेले टोकन येथील चलनात वापरली जात आहे. त्यामुळे खेळाडु टोकन खरेदी करुन नगद पैशाचा डाव तोडत आहे.शहराच्या मध्यभागी असलेली भव्य ईमारत जुगार अड्यासाठी प्रसीध्द आहे.
मनोरंजनच्या नावाखाली हार जित
या खेळा मध्ये लाख रुपये हारलेली व्यक्ती गम भुलण्यासाठी यथेच्छ दारु प्राशन करीत घरचा रस्ता पकडत आहेत.मात्र खेळात लाख रुपये जिंकलेला खेळाडु हा खिसा खाली होई पर्यंत आपली इच्छा पूर्ती करतांना दिसुन येत आहे.
जुगार अड्डा अवैध
मानव हा बुध्दीजिवी प्राणी असुन मनोरंजन करण्यासाठी तो काही किंमत चुकवायला तयार आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत काही नियम असुन नियमबाह्य खेळाला परवानगी दिली जात नाही. मात्र येथे भरलेला क्लब नियम धाब्यावर बसवुन सुरु असुन हा अवैध व्यवसाय बंद व्हावा अशी मागणी जोर धरत आहे.