Type Here to Get Search Results !

बाळंतीण महिलांचा 'माहेरचा आहेर' देऊन महिलादिनी गौरव,

बाळंतीण महिलांचा 'माहेरचा आहेर' देऊन महिलादिनी गौरव

चिमुकल्यांना मच्छरदाणी भेट!


दिग्रस :- प्रतिनिधी 
महिलादिन सर्वत्र साजरा केला जातो. या कार्यक्रमांमधून महिलांना कोरडा उपदेश दिल्या जातो. भाषणांशिवाय दुसरं काहीही त्यांच्या पदरी पडत नाही. मात्र हरसूल या छोट्याशा गावात कृतीयुक्त महिला दिन साजरा करून येथील महिला संस्कार कलशने आगळावेगळा पायंडा पाडला आहे.

हरसूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन आणि प्रसुतीसाठी महिला दाखल होत असतात. अशा सर्व महिलांना साडीचोळीचा आहेर या महिलांनी केला. माहेरच्या ओलाव्याने मिळालेला पहिला आहेर पाहून या महिलाही हरखून गेल्या होत्या. शिवाय नवजात चिमुकल्या बाळांसाठी मच्छरदाणी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच सौ. गोकुळा दुमारे, संस्कार कलशच्या संस्थापक

लताताई उपलेंचवार, हरसूल युनिटच्या अध्यक्ष उज्वला मानकर उपस्थित होत्या.

लता उपलेंचवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधत गोष्टीतून आईची जबाबदारी आणि संस्काराचे जीवनातील महत्त्व सांगितले. उज्वला महेंद्र मानकर यांनी महिला दिन का साजरा केल्या जातो करतो हे स्पष्ट करतांनाच महिलांची शक्ती मोठी असल्याचे सांगितले. महिलांनी वेळोवेळी अन्याया विरुद्ध लढून आपली शक्ती दाखवून दिली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाला कल्पना वाघाडे, शुभ्रमाला ढोले, निकिता खवले, सुवर्णा सोनुने, कोकिळा वायफळकर, कमला दिनकर, सुरेखा अलोने, वैशाली बिडवई, अनिता बोरगावकर, कल्पना दुधे, उषाताई देशमुख, कांचन दुधे, वनिता ठाकरे, ज्योती उपलेंचवार, वैशाली धोत्रे, परविन मलनस, आसमा चौहान, अश्विनी दुधे, कोमल राठोड शिला मोरे, सुमित्रा दुमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंगळे ताई, कलोशे भाऊ यांनी परिश्रम घेतले. महिला दिनाच्या या कार्यक्रमाचे संचलन शिला मोरे यांनी केले. कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies