Type Here to Get Search Results !

मारेगाव मैत्री कट्टा तर्फे महिला दिन साजरा

मारेगाव मैत्री कट्टा तर्फे  महिला दिन साजरा

🔸दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
🔸सांस्कृतिक रॅली ने लक्ष वेधले

मारेगाव:-प्रतिनिधी 
येथिल मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने मारेगाव येथे जागतिक महिला दिन निमित्य दोन दिवसीय भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

एकेकाळी शहरात मोठी सामाजिक, सांस्कृतिक चळवळ राबविणाऱ्या मारेगाव च्या युवकयुवतींनी तब्बल 30 वर्षांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने मारेगावात नवीन पिढीला चालना देण्यासाठी मैत्री कट्टा ग्रुप ची स्थापना केली आहे.
या ग्रुप तर्फे मारेगाव येथे जल्लोष 2022 नावाने भव्य महिला दिन साजरा करण्यात आला.सकाळी शहरातून महिला सांस्कृतिक रॅली काढण्यात आली. यात विविध देखावे, लेझीम पथक,दंडार पथक,पथनाट्य यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

रात्री खास महिलांकरिता एकल,युगल,समूह अश्या तीन गटात नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यात समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक हॅपी डान्स ग्रुप ने पटकावले तर द्वितीय सुवर्णा नरांजे & ग्रुप,तर तृतीय पिंगा ग पोरी पिंगा ग्रुप यांनी पटकावले.तसेच एकल नृत्य स्पर्धेत मीरा दुपारे यांनी प्रथम तर ज्योत्स्ना भोगेकर यांनी द्वितीय तर नेहा वाघदरकर यांना तृतीय पारितोषिक मिळाले.तसेच युगल नृत्य स्पर्धत गुंडावार व प्रिया घाणे या प्रथम तर वैशाली सारवे व रुपाली दुधकोहळे द्वितीय तर चित्रा दैने व अश्विनी ठेपाले यांनी तृतीय पारितोषिक पटकावले.
सत्कार समारंभ मध्ये नवनिर्वाचित महिला नगरसेवीकांचा व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोरोना योद्धा, आशा वर्कर,सफाई कामगार, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिला,आर्थिक सबलीकरण करणाऱ्या महिला,पत्रकार बंधु, यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत जिनिंग व रंगनाथ स्वामी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ऍड.देवीदासजी काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अरुणाताई खंडाळकर,प.स.सभापती शितलताई पोटे, नायब तहसीलदार अरुण भगत उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय रायपुरे यांनी केले. संचालन बिना हेपट आणि मेहमुद खान यांनी केले तर आभार मिलिंद डोहणे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बिना हेपट,दीपक जुनेजा, प्रतिभा डाखरे ,शैलजा ठाणेकर ,उदय रायपुरे,गजानन जयस्वाल,मयुरी जयस्वाल,वनमाला बोढे, मंजुषा भगत,माया गाडगे,वंदना गाणार,अनिता खैरे, सरिता वानखेडे, शितल मडावी आदी मैत्री कट्टा ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies