मारेगाव न्यायालयात महिला दिन साजरा
महिलांची भरगच्च उपस्थितीयुवतींनी सादर केले पथनाट्य
मारेगाव:- प्रतिनिधी
येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात 8 मार्च ला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश यांच्या सुविध्य पत्नी इंजिनिअर सौ.श्यामली निलेश वासाडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वानखेडे. सरकारी वकील सौ.चैताली खांडरे, सावित्रीबाई फुले केंद्राच्या अध्यक्ष संगीता डाहूले,एड.हुमेरा शरीफ, न्यायालय लिपिक वर्षा कऱ्हाड मंचावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अतिथींनी महिला सबलीकरण, कौटुंबिक हिंसाचार, महिलांचे हक्क आदी विषयावर उपस्थिती महिलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कला,वाणिज्य महाविद्यालयातील विध्यार्थीनींनी बालविवाह, हुंडाबळी या विषयावर सुंदर पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन एड. काजल शेख यांनी तर आभार प्रदर्शन एड. भाग्यश्री बदखल यांनी केले.या कार्यक्रमात न्यायाधीश निलेश वासाडे,एड.एन.एस. हुसेनी उपस्थित होते. यावेळी शहरातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.