चोरट्यांनी केले आठ क्विंटल सोयाबीन लंपास
🔹️मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारातील घटनाबातमीदार :- राज पिपराडे
तालुक्यात चोरीचे प्रमाण वाढत असून मागील काही महिन्यात चोरट्यांनी चक्क शेतमालावर हात साफ करणे सुरू केले आहे.
वेगाव येथील शेतकरी प्रमोद भाऊराव देरकर यांचे शेत डोंगरगाव रस्त्यांने आहे. शेतातील असलेल्या बंड्यातुन अज्ञात चोरट्यांनी दिनांक २३/०१/२०२२ च्या रात्रीला आठ क्विंटल सोयाबीन लंपास केले. दरम्यान पीडित शेतकऱ्याने मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करीत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी याच शिवारातील शेतकरी वसंतराव काकडे यांच्या शेतामधून दोन लाखाचा शेतमाल चोरट्यांनी लंपास केला होता.आजतागायत त्या चोरट्यांचा तपास लागला नसून पुन्हा चोरट्यांने शेताशिवारात हात साफ करणे कायम ठेवले त्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड भीतीचे सावट निर्माण झाले आहे.