मारेगाव तालुक्यात मतदान दिनानिमित्त ठिक ठिकाणी जनजागृती
🔸 नेहरू युवा केंद्राचा उपक्रम
वेगाव :- राज पिपराडे
नेहरू युवा केंद्र यवतमाळ तालुका मारेगाव अंतर्गत मारेगाव, वेगाव,केगाव येथे मतदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक मोहन पायघन यांनी भारतीय संविधानाने प्रत्येक 18 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तसेच मतदान करण्याबाबतचे आपले अधिकार या बद्दल माहिती देत नागरिकांना जनजागृती करण्यात आली व मतदान दिनानिमित्त शपथ देऊन नवीन मतदारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केगाव येथील विनोद ठावरी,दीपक पिंपळकार,रवींद्र मेश्राम. वेगाव येथील विलास गोवारकर,प्रफुल सुर तर मारेगाव येथील संतोष कनाके,रोशन हेपट उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम तसेच अनिल ढेंगे नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.