Type Here to Get Search Results !

प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत संपवली जिवनयात्रा

प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत संपवली जिवनयात्रा

औरंगाबाद शहरातील हर्सुल परिसरात धक्कादायक घटना घडली.  पती घराबाहेर जाताच घरात आलेल्या प्रियकरासोबत विवाहितेने एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. काही वेळाने खेळून घरी आलेल्या मुलांना दरवाजा बंद दिसल्याने त्यांनी इतरांना हा प्रकार सांगीतल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली.

सीमा ईश्वर कांबळे (वय- ३५) आणि सचिन गंगाधर पेटारे (वय- २७) अशी मयत प्रियकर व प्रेयसीची नावे आहेत. मयत सिमाचा पती इश्वर हा गॅस एजन्सीत कामाला असून प्रियकर सचिन प्लंबर होता. इश्वर आणि सचिन यांची जुजबी ओळख होती. त्या माध्यमातून सिमा व सचिन यांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर सहवासात व नंतर प्रेमात झाले. सचिन देखील विवाहीत होता. त्याच्या पत्नीला पती सचिनचे प्रेमसंबंध माहिती नव्हते असे म्हटले जात आहे. सचिनच्या परिवारातील सदस्यांनी त्याला सिमासोबतचे प्रेमसंबंध  थांबवण्यास सांगितले होते. मात्र सचिनने ऐकले नव्हते.



घटनेच्या वेळी सिमाचा पती इश्वर कामावर गेला होता आणि मुले खेळण्यासाठी बाहेर गेली होती. दरम्यान सचिन तिच्याजवळ आला आणि दोघांनी एकाच साडीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली. मुले खेळून घरी परत आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे परिसरातील लोकांसह नातेवाईकांना खरा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies