बारा हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास अटक
राळेगाव येथील घटना
राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ट्रँक्टर कोपरी ते राळेगाव रेतीची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दरमहा महिना १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या राळेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार शालिक किसनराव लडके याच्याविरुद्ध यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवालदारला ताब्यात घेवून राळेगाव ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
तक्रारदाराने दि.९ ऑगस्ट रोजी यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे १० ऑगस्ट रोज मंगळवारला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या राळेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार शालिक किसनराव लडके याच्याविरुद्ध राळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.
तक्रारदाराकडे १२ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीत १२ हजारांची लाच देण्याचे ठरले. तक्रारदाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली. लाचलुचपतचे पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर नालट यांच्या पथकाने पोलीस जमादार बिट कक्ष येथे सापळा रचला. तक्रारदार यांना आरोपी लडके याने लाच घेतल्याचे मान्य केले आहे. सदर ही कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक (परिक्षेत) विशाल गायकवाड, व अरून सांवत, अप्पर पोलीस अधीक्षक, राजेश मुळे, पोलीस उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नालटे यवतमाळ,अमंलदार सचिन भोयर,राकेश सावसाकडे,किरण खेडकर, वसिम शेख, महेश वकोडे,राहुल गेडाम,व चालक सुधाकर कोकेवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी ही कारवाई आहे