हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना रँचोचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील घटना
महागाव/प्रतिनिधी
यवतमाळ:- महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील शेख इस्माईल शेख इब्राहिम वय २४ वर्ष याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. तर मागील ३ वर्षा पासून इस्माईल ने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेत होता हळू हळूहळू त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते इस्माईल हा पत्रकारागिर होता त्याला एक भाऊ आणि एक बहीण मोठा भाऊ मुस्सवीर हा गॅस वेल्डर आहे तर वडील घरीच असतात इस्माईल हा शेख इब्राहिम यांचा दुसऱ्या नंबर चा मुलगा हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना मुत्यु झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेख इब्राहिम यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने इस्माईल हा पत्रकारागिर असल्याने तो अलमारी कुलर असे विविध उपकरणे बनवायचा इस्माईल हा फक्त ८ वा वर्ग शिकलेला. पण एक दिवस त्याला काय माहीत कसे सुचले त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले आणि त्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला आणि हळूहळू एक एक पार्ट तयार करू लागला आणि २ वर्षाच्या प्रयत्नानंतर दि. ११ ऑगस्ट रोज बुधवार ला त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते आणि १० ऑगस्ट रोजी च्या रात्री त्याने बनविलेल्या हेलिकॉप्टर ची ट्रायल घेण्यास सुरुवात केली. जमिनीवर इंजिन सुरू केले इंजिन ७५० अम्पियर वर फिरत होते सर्व व्यवस्थित सुरू होते पण अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि त्यामुळे मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईल च्या डोक्यात लागला आणि पाहता पाहता सर्व स्वप्न भंग झाले आणि डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईल चा मृत्यू झाला
त्याचे स्वप्न होते की एक दिवस तो त्याच्या आणि त्याच्या गावाचे नाव जगाच्या नकाशावर कोरण्याचे न पण इस्माईलचे स्वप्न अर्धवटच राहिले
आणि फुलसावंगीच्या रँचोचा ट्रायल दरम्यान मृत्यू झाल्याने शेख इब्राहिम यांचे स्वप्न अधुरे राहिले.