Type Here to Get Search Results !

वृद्ध शेतकऱ्याची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या

वृद्ध शेतकऱ्याची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या
      
       म्हैसदोडका येथील घटना

प्रतिनिधी/सुधाकर मेश्राम

म्हैसदोडका येथील एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची विहिरीत उडी घेवुन
  आपली जीवनयात्रा संपविल्याची आज बुधवार दि. ७ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत सविस्तर असे की, म्हैसदोडका येथील श्रीराम गणू मेश्राम (वय ७५) याचा मृतदेह सगनापूर शेतशिवारातील  असलेल्या विठ्ठल ठावरी यांचे शेतातील विहिरीत आढळून आला. श्रीराम हा काल पासुनच गावातून बेपत्ता होता.  नातेवाईका कडे शोध घेतला असता  नातेवाईका कडे श्रीराम आढळून आले नसल्याने आज बुधवार दि.७जुलै रोजी सकाळी गावा शेजारी विहिरी व सगणापुर शिवारातील विहिरी नातेवाईक कुटुंबातील सदस्यानी तपासणी केली असता  सकाळी ६.३०वाजताच्या दरम्यान विठ्ठल ठावरी यांच्या शेतातील विहिरीच्या शेजारी काठी चप्पल व कपडे आढळून आले विहिरीत पाहिले असता तर मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.व घटनेची माहीती मारेगाव  पोलिस स्टेशनला देण्यात आली असुन घटनास्थळी पोलीस दाखल होवून घटनेचा पंचनामा करण्यात येवून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्याची तयारी सुरू होती. श्रीराम यांच्या पश्चात पत्नी, ३मुले २ विवाहित मुली असा आपत्य परिवार श्रीराम यांच्या पाठीमागे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies