Type Here to Get Search Results !

राज्यात भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण तातडीने करा-भटक्या विमुक्तांची मागणीकेंद्र सरकारने उचललेल्या पावलाला सकारात्मक प्रतिसाद द्याअन्यथा राज्यव्यापी तिव्र जनआंदोलनाचा इशाराजिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार

राज्यात भटक्या विमुक्तांचे सर्वेक्षण तातडीने करा-भटक्या विमुक्तांची मागणी

केंद्र सरकारने उचललेल्या पावलाला सकारात्मक प्रतिसाद द्या

अन्यथा राज्यव्यापी तिव्र जनआंदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार

वणी - केंद्र सरकारने सुरू केलेल्या, अधिसूचित, भटके, विमुक्त आणि अर्ध भटक्या जाती जमातींचे सर्वेक्षण महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावी, अशी मागणी भटक्या विमुक्तांच्या विविध संघटनांनी VJNT सर्वेक्षण, जनगणना लढा कृती समितीच्या वतीने आज (ता ७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून केली. 
या संदर्भात तहसीलदार वणी यांना कृती समितीच्या वतीने निवेदन सादर केले.  ७० वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने  विमुक्त,भटके आणि अर्ध भटक्या जाती- जमातींसाठी (DWBDNC) विकास आणि कल्याण मंडळ स्थापन केले आहे. 
 या माध्यमातून वंचित, अत्यंत मागास व उपेक्षित भटके विमुक्त जाती जमातींना मूलभूत अधिकार प्रदान करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्य सरकारी यंत्रणेमार्फत केंद्र सरकारच्या पत्र क्र.डी.ओ. क्रमांक: ११०२०/२ /२०२० - DWBDNC, दि १८ आॅगस्ट २०२० रोजीच्या पत्रान्वये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लोकसांख्यिकीय प्रोफाइल, सामाजिक-आर्थिक स्थितीची सर्वंकष माहिती गोळा करण्यात येणार होती. 
 सततचे होणारे स्थलांतर, पालात वास्तव्य, भूमीहिन, कागदपत्रांचा अभाव, आरोग्य व शिक्षण हे अत्यंत ज्वलंत प्रश्न आजही या समाजासमोर आहेत. सरकारजवळ अद्यापही या समाजाची सर्वंकष माहिती नाही. त्यामुळे यांच्या विकास व कल्याणाच्या योजना अस्तित्वात नाहित. हे प्रस्तावित सर्वेक्षण या समाजासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या सर्वेक्षणानंतर विविध योजना अमलात येवून हा दुर्लक्षित समाज मुख्य प्रवाहात समाविष्ट होईल. 
मात्र राज्यातील भटक्या विमुक्तांचे  सर्वेक्षण होऊ नये, या हेतूने मंत्रालयातील काही शुक्राचार्यानी या पत्राला केराची टोपली दाखवत भटक्या विमुक्तांच्या हक्कावर गदा आणली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व भटक्या विमुक्त कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लक्ष घालून हे सर्वेक्षण तातडीने सुरू करावे व भटक्या विमुक्तांना हक्कांपासून डावलणा-या अधिका-यांवर कार्यवाही करावी अशी मागणी गजानन चंदावार, संघटक VJNT सर्वेक्षण जनगणना कृती समिती, शाखा वणी, राकेश बुग्गेवार, नगरसेवक नगर परिषद वणी, सुरज गज्जलवार, माहिती अधिकार कार्यकर्ता तथा मुख्यसंयोजक विद्यार्थी संघर्ष वाहिनी महाराष्ट्र, अमोल मसेवार, प्रसिद्धी प्रमुख बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीवर निर्णय न झाल्यास तिव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा VJNT सर्वेक्षण जनगणना लढा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies