पोलिस हवालदाराची धारदार चाकूने गळा कापून हत्या
नागेपल्ली येथील घटना.
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली तालुक्यातील पोलीस स्टेशन परिक्षेत्रात अंतर्गत पोलीस हवालदाराची अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार चाकूने गळा कापून हत्या घटना घडली जगन्नाथ सिडाम हे राहत्या घरी नागेपल्ली येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये काल सांयकाळी झोपून असल्याने त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जगन्नाथ सिडाम वय ५३ असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भामरागड़ तालुक्यातिल धोडराज पोलिस मदत केंन्द्रात वाहन चालक येथे कार्यरत होते.
काल सायंकाळी ते नागेपल्ली येथील आपल्या राहत्या घरी झोपून असताना अज्ञात मारेकर्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना उठविले व घरामध्ये प्रवेश करून काही कळायच्या आतच धारदार चाकूने त्यांचा गळा कापला असल्याची माहिती घराशेजारी असलेल्या लोकांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवून हवालदार जगन्नाथ सिडाम यांना प्रथम अल्लापल्ली रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे हालविण्यात आले हवालदार जगन्नाथ सिडाम यांचे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव गेले असल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, विशाल ठाकुर,पोलिस निरीक्षक प्रविण डांगे, आणि श्वान पथकासह दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे..