चोरीचे सत्र सुरूच : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरट्याने फोडली
चोरट्याने पळविले शाळेचे १८ हजार रुपये किमतीचे साहित्य
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर येथून बारा कि.मी.अंतरावर असलेल्या मौजे नरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी झाली असल्याची घटना .बाळापूर परिसरातील आठवड्यातील ही तिसरी घटना आहे . मध्यरात्री चोरांनी शाळेचे कुलूप व दरवाजा तोडून प्रवेश केला, १८हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्याने लांबविले .
आखाडा बाळापूर येथून बारा की.मी.अंतरावर असलेल्या मौजे नरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी झाली .बाळापूर परिसरातील आठवड्यातील ही तिसरी घटना आहे . मध्यरात्री चोरांनी शाळेचे कुलूप व दरवाजा तोडून प्रवेश केला, १८हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्याने लांबविले . शाळेत असलेली एलसीडी 32 इंची टी व्ही किंमत ८००० रुपये व किचन किट किंमत१० हजार रुपये असा एकूण मुद्देमाल १८ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्याने लांबविले .या प्रकरणी येथील शिक्षक सिद्धेश्वर नरवाडे यांनी दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास स.पो.,नि.रवी हुंडेकर यांचे मार्गदर्शनाखाली जमादार नांगरे करीत आहेत .आखाडा बाळापूर परिसरात चोर सक्रिय झाले असून यावर अंकुश लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे .