वरझडी येथे विज पडुन एक ठार दोन गंभीर जखमी
वणी तालुक्यातील घटना
धनराज भोयर
वणी तालुक्यातील वरझडी(बंडा-देव)येथे आज दि.७ जुलै रोज बुधवार दुपारी तिन वाजतच्या सुमारास मघगर्जनेसह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. यावेळी शंकर गणपत लोनबळे, सुचिता मारोती काळे, पिगलाबाई लोनबळे हे सकाळी शेतीच्या कामासाठी शेतात गेले असता दुपारच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाट सह पाऊसाला सुरुवात झाल्याने शंकर लोनबळे, सुचिता काळे.पिगलबाई लोनबळे पाऊसा पासून बचाव करण्यासाठी शेतामध्ये असलेल्या टिनाच्या झोपडीमध्ये थांबले असता झोपडी वरच विज पडल्याने शंकर लोनबळे रा. वरझडी (देवी) यांच्या आंगावर विज पडल्याने ते जागीच ठार झाले तर सुचिता काळे, पिगलाबाई लोनबळे या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असल्याने शंकर सह तिघांना वणी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता शंकर लोनबळे यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्यू घोषित केले असून सुचिता काळे व पिगलाबाई लोनबळे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असुन . या धक्कादायक घटनेने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे.