पान टपरीला घेवून ट्रक हॉटेलमध्ये शिरला, ट्रक चालक थोडक्यात बचावला हॉटेलचे नुकसान !
चारगाव येथील घटना
प्रतिनिधी/पियुष चव्हाण
वणी शहरा पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चारगाव चौकी येथे ७ जुलैच्या कोळसा वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या पान टपरी सह आझाद हॉटेलमध्ये शिरल्याने पान टपरी व हाटेलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या घटनेमध्ये ट्रक चालक थोडक्यात बचावला ही घटना ७ जुलैला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चारगाव चौकी येथे घडली. कोळसा वाहतूक करणारा भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारगाव चौकी येथील आजाद हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात ट्रक चालकाला कुठलीही इजा झाली नसून रस्त्याच्या कडेला असलेल्या पान टपरीचे व हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रस्त्यालगत असलेल्या आझाद हॉटेलमध्य पॉवर प्लांट क मिळाले आहे. या कंपनीचा एम एच ४० डी सी २१८० हा ट्रक वर्धा पॉवर प्लांट करिता कोळसा भरण्यास जात असतांना ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक सरळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या हॉटेलमध्ये शिरला. पैनगंगा कोळसा खाणीतून वर्धा पॉवर प्लांट अशी कोळशाची वाहतूक सुरु असतांना ट्रक विरुद्ध दिशेने असलेल्या पान टपरीला घेवुन हॉटेलमध्ये कसा काय घुसला ही एकच चर्चा घटना स्थळावर ऐकायला मिळत होती. शिरपूर आबई फाटा मार्गे पैनगंगा हा ट्रकचा मार्ग आहे. पण ट्रक घुग्गुस मार्गावरील पान टपरी व आझाद हॉटेलकडे कसा काय शिरला याचेच नवल वाटते. या अपघातात ट्रक चालक किशोर पिंपळशेंडे याला कुठलीही दुखापत झाली नसून पान टपरी व हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.