खातेरा येथे वीज पडून २६ बकऱ्या जागीच ठार
झरीजामणी तालुक्यातील घटना
झरीजामणी तालुक्यातील खातेरा येथे विज पडून २६ बकऱ्याचा जागेवर ठार झाल्याची धक्कादायक घटना घडलीखातेरा परिसरात आभाळ दाटून आले असता, चार वाजताच्या दरम्यान, विजेचा कडकडाट सुरु झाला असता, पावसाला सुरुवात झाली. यावेळी बकऱ्या चरत होत्या अशातच जोरदार विज पडली आणि दुर्दैवाने २६ बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यामध्ये बळीराम गोडे ३, नग धर्मा वाघाडे १, दशरत बुट्टे २ नग, शंकर गायकवाड २ नग, दत्ता जुनगरी १ नग, नारायण भोयर १ नग, अंबादास वासेकार १ नग ,सचिन पांडे ५ नग, विकास आगरकर ३ नग ,पंढरी गेडाम ५ नग, अमोल सोनटक्के १ नग, सचिन पांडे १ नग अशा एकूण २६ च्या वर बकऱ्या दगावल्याची घटना गावापासून एक किमी अंतरावर चराई साठी गेलेल्या जंगलात घडली. या दरम्यान, जोरदार पाऊस व विजेचा कडकडाट झाला. ज्यामुळे ह्या बकऱ्या जागीच ठार झाल्या धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
