Type Here to Get Search Results !

सतीश जाधव यांची बिरसा फायटर्सच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी निवड

सतीश जाधव यांची बिरसा फायटर्सच्या ठाणे  जिल्हाध्यक्ष   पदी निवड

ठाणे : सतीश जाधव यांची बिरसा फायटर्सच्या ठाणे  जिल्हाध्यक्ष  पदी निवड  करण्यात आली आहे.सतीश जाधव हे एक समाजसेवक असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी  झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत सतीश जाधव यांची ठाणे  जिल्हाध्यक्ष  पदी निवड केल्याची  घोषणा  सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स  यांनी केली.
     या सभेला सुशीलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष,मनोज पावरा नवनिर्वाचित राज्याध्यक्ष,राजेश धुर्वे उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, केशव पवार महानिरीक्षक,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी ,कोषाध्यक्ष दादाजी बागूल, राज्य प्रवक्ता रोहीत पावरा,सल्लागार अॅड. जगदीश पावरा,अॅड.रमेश पावरा,महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार,राज्यसदस्य मनोहर पाडवी,देवीदास वसावे,अशोक वळवी,अर्जून जाधव ,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड,महासचिव उमाकांत कापडनीस , महेश्वरी कापडणीस नाशिक महिला प्रतिनिधी, बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रितेश पावरा,नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,मुंबई जिल्हाध्यक्ष संदिप रघतवान,विपूल वळवी ,विजय सहारे,वसंत पावरा  इत्यादी बिरसा फायटर्सचे  पदाधिकारी बांधव उपस्थित होते.उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी सतीश जाधव यांची बिरसा फायटर्स ठाणे  जिल्हाध्यक्ष  पदी निवड  झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.सतीश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
      ठाणे  जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठीआपण काम करणार आहोत. तसेच ठाणे  जिल्हयात बिरसा फायटर्सच्या तालुका   शाखा आपण वाढवणार आहोत  .अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित ठाणे  जिल्हाध्यक्ष सतीश जाधव यांनी व्यक्त केली.   
       सतीश जाधव यांची बिरसा फायटर्सच्या ठाणे  जिल्हाध्यक्ष   पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातून आदिवासी बांधवांकडून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies