मनोज कामडी यांची बिरसा फायटर्सच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड
पालघर : मनोज कामडी यांची बिरसा फायटर्सच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.मनोज कामडी हे एक समाजसेवक असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.समाजकार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. तसेच निर्भीड पत्रकार म्हणून सुद्धा त्यांची विशेष ओळख आहे. सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जून 2021 रोजी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विस्तार व विदर्भ-पुणे विभागातील नवीन शाखा पदग्रहण सोहळासाठी झूम सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत मनोज कामडी यांची पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याची घोषणा सुशिलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी केली.
या सभेला सुशीलकुमार पावरा संस्थापक अध्यक्ष,मनोज पावरा नवनिर्वाचित राज्याध्यक्ष,राजेश धुर्वे उपाध्यक्ष, राजेंद्र पाडवी महासचिव, केशव पवार महानिरीक्षक,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी ,कोषाध्यक्ष दादाजी बागूल, राज्य प्रवक्ता रोहीत पावरा,सल्लागार अॅड. जगदीश पावरा,अॅड.रमेश पावरा,महिला प्रतिनिधी चंद्रभागा पवार,राज्यसदस्य मनोहर पाडवी,देवीदास वसावे,अशोक वळवी,अर्जून जाधव ,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव,नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे, मनोज कामडी जिल्हाध्यक्ष पालघर, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल गायकवाड,महासचिव उमाकांत कापडनीस , महेश्वरी कापडणीस नाशिक महिला प्रतिनिधी, बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,विभाग प्रसिद्धीप्रमुख प्रितेश पावरा,नंदुरबार प्रसिद्धी प्रमुख गणेश खर्डे, शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,मुंबई जिल्हाध्यक्ष संदिप रघतवान,विपूल वळवी ,विजय सहारे,वसंत पावरा इत्यादी बिरसा फायटर्सचे पदाधिकारी बांधव उपस्थित होते.उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी मनोज कामडी यांची बिरसा फायटर्स पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.मनोज कामडी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठीआपण काम करणार आहोत. तसेच पालघर जिल्हयात बिरसा फायटर्सच्या तालुका शाखा आपण लवकरच वाढवणार आहोत .अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी यांनी व्यक्त केली.
मनोज कामडी यांची बिरसा फायटर्सच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल उपस्थित पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातून आदिवासी बांधवांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.