Type Here to Get Search Results !

शासकीय कामात अडथळा करणाऱ्या ‘ होमगार्डला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शासकीय कामात अडथळा करणाऱ्या ‘ होमगार्डला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 होमगार्ड सात दिवसांपासून होता फरार,  होमगार्ड बालाजी शिंदेला पोलिस कोठडी


पूर्णा : वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका सोबत हुज्जत घालणाऱ्या होमगार्डला पकडण्यास पूर्णा पोलिसांनी सातव्या दिवशी मंगळवार दि..२९ जून रोजी सांयकाळी ९ वाजता अटक केली आहे.
वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनास पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासोबत हुज्जत घालणाऱ्या होमगार्डला पकडण्यास पूर्णा पोलिसांनी सातव्या दिवशी मंगळवार २९ जून रोजी सांयकाळी ९ वाजता पोलिसांनी अटक करून ३०जुन रोजी आरोपी बालाजी शिंदे यास पूर्णा न्यायलयात हजर केले असता,  न्यायालयाने आरोपी होमगार्ड बालाजी शिंदे  याला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असुन. पूर्णा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या बालाजी शिंदे याने पोलिसांशीच हुज्जत घालुन पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सात दिवसांपूर्वी (ता.२२ जुन) रोजी रात्री ९ वाजता तालुक्यातील – बरबडी गावात घडली होती. या प्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्या होमगार्डवर  शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेस  सात दिवसांचा कालावधी उलटुनही तो  होमगार्ड पोलिसांना सापडत नसल्याने पूर्णा पोलिसांवर त्याला पोलिस ठाण्यातुनच कोणीतरी पाठीशी घालत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात होता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies