आरोग्य संबंधित विषयावर वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन!
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन
हिंगणघाट /वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद हिंगणघाट च्या वतीने हिंगणघाट नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना शहरातील डेंगू आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर नियंत्रण आणण्याकरीता उपाययोजना करण्याकरीता निवेदन देण्यात आले.
हिंगणघाट शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून डेंगू या विषाणू जन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामध्ये काही दिवस पडणाऱ्या पावसाने उघडीप घेतल्यामुळे जागोजागी साचून राहिलेल्या पाण्यात डेंगू चे विषाणू वाढतात. इडास जाती च्या डासांमुळे हा आजार पसरतो. डेंगू हा विषाणूजन्य आजार असून हा तीव्र फ्लू सारखा आजार आहे आणि या मध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारांवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे
त्याकरिता संपूर्ण शहरात नाली सफाई, धूर फवारणी व साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये आणि नाल्यामध्ये विषानुनाशक औषधी ची फवारणी करण्या संबंधी चे निवेदन देण्यात आले व उपाययोजना करण्या संबंधी चर्चा करण्यात आली. मा. मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित निवेदनावर विचार करून पुढील कार्यवाही करिता पाठविले व लवकरच सुचवलेल्या उपाय योजनां करण्यात येईल याबद्दल आश्वासन दिले.
यावेळी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय थूटे, तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, तालुका सचिव गौरव गोहाडे, अभिजीत साबळे, रजत मोगरे, शुभम घोडे आदि पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.