उत्तरप्रदेश येथील ट्रक चालकांनी गांगापुर शिवारात गळफास घेऊन केली आत्महत्या
हिंगणघाट तालुक्यातील घटना
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/ सचिन महाजन
हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील गांगापूर शिवारात गुरुद्यालसिंग यांचे धाब्यासमोर आज सोमवारी ५ जुलै ला ट्रक चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघकीस आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक ट्रक चालकाचे नाव अब्दुल हमीद शेख वय ४५ वर्ष राहणार सिमोरीयाव उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.
अब्दुल हमीद शेख हा रामायण पेठ वरून कानपूर येथे ट्रक घेऊन जात होता.त्याने आपला ट्रक नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील गांगापूर शिवारात गुरुदयाल सिंग यांचे धाब्यावर उभा ठेवून बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती वडनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ट्रक चालक
अब्दुल हमीद शेख यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन या घटनेचा पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य करीत