Type Here to Get Search Results !

पोकरा प्रकल्पाच्या गावातील शेतकऱ्यांची पीक स्पर्धेत राज्यापर्यंत मजल

पोकरा प्रकल्पाच्या गावातील शेतकऱ्यांची पीक स्पर्धेत राज्यापर्यंत मजल

       जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन

सुधाकर बापूजी कुमरे या लोणसावळी गावातील शेतकरी यांनी अनुसूचित जमाती या गटात रब्बी गहू पिकात राज्यात दुसरा क्रमांक पटकावून जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर गाजवले
सन २०२० मधील रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत त्यांनी गहू या पिकासाठी भाग घेतला होता ही स्पर्धा अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण या दोन गटात घेतली जाते स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या शेतात पाहणी करून त्यांच्या शेतातील १० * १० मीटर च्या भागातील पिकाचे काढणी आणि मळणी करून आलेल्या उत्पन्नाच्या आधारावर स्पर्धेचा निकाल लावला जातो 
         सुधाकर कुमरे यांच्याशी चर्चा केली असता पोकरा प्रकल्प अंतर्गत होणाऱ्या शेतीशाळान  मधून केले जानाऱ्या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे समजले.तसेच कृषी सहाय्यक अंकुश लोकरे आणि कृषी विभागाच्या इतर क्षेत्रिय कर्मचाऱ्यांचे पण मार्गदर्शन त्यांना लाभले. 
       त्यांच्याप्रमाणे त्यांच्या गावातील अमोल येवले यांनी नागपूर विभागातून हरभरा पिकात प्रथम क्रमांक, बाबुराव कुमरे यांनी जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
          त्यांनी गावातील इतर शेतकऱ्यांना सुद्धा पीक स्पर्धेत भाग घेऊन स्वतःचे स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्याचे आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांच्या शेतीशाळेत भाग घेऊन शेतीविषयक ज्ञानात वृद्धि करून आपली शेती सुजलाम-सुफलाम करण्याचे आव्हान केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies