मांडगाव येथील पावसामुळे वार्ड क्रमांक ३चा जनसंपर्क तुटला
स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे नियोजन शून्य
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन
मांडगाव येथील लेंडी नाल्यावरील काल पासुन सुरु असलेल्या पावसात नाल्यावरील पुलाच्या वरून पाणी वाहू लागले आहे व वॉर्ड क्र ४ चा संपर्क सुद्दा तुटला आहे,पलीकडील नागरिकांना गावाशी संपर्कासाठी एकच रस्तात्यावरून येणे जाने करावे लागत असे,तर माणसाच्या निगडीत असलेल्या दैनिक आहारा मध्ये किराणा,दवाखाना
मेडिकल,तसेच इतर सर्व गरजां पूर्ण करण्यासाठी पेठेतील लोकांना नवीन वस्ती शिवाय पर्याय नाही,परंतु पुलावरून पाणी असतांना जीव मुठीत घेऊन
लेंडी नाल्यावरून येने जाणे करावं लागत आहे तर कोणी पाणी ओसरण्याची वाट पहात आहे.
काही नागरिकांच्या शेती पुलाच्या विरुद्ध दिशेने असुन त्यांना मोठ्या त्रासाचा सामोरे जावे लागत आहे.
पुलावरील पावसामुळे बैलांना चारा पाणी सुद्धा करता येत नाही याचा फटका जनावरांना सुद्धा बसतानां दिसत आहे.
सद्यस्थितीत असलेला पूल हा खूप अरुंद आहे,तसेच उंची सुद्धा कमी आहे तर पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे.थोड्याच पावसात पुलावरून पाणी वाहून जाते व रास्ता बंद होते,दरवर्षी पावसाळ्यात यासंबंधी अधिकारी तसेच जनप्रतिनिधी ना माहिती देण्यात येते,त्यांनी सुद्धा परिस्थिती पहिली आहे,परंतु पावसाळा संपल्यावर या सर्वांनाच पुलाचा विसर पडतो,
पुलावर सुरक्षारक्षक कठडे सुद्धा नाहीत त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,पुलाच्या नुतनीकरण बाबत कळवावे लागते,तरी पूल मंजूर करून मांडगाव येथील नागरिकांना दिलासा द्यावा, होणाऱ्या अपघातापासून वाचवावे
अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी दैनिक विदर्भ कल्याण या वृत्तपत्र्याची बोलतांना सांगितले आहे.