Type Here to Get Search Results !

खरीप हंगामातील पिकाचे व्यवस्थापन या विषयावर ऑडिओ कॉन्फरसिंगद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खरीप हंगामातील पिकाचे व्यवस्थापन या विषयावर ऑडिओ कॉन्फरसिंगद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन 

   सचिन मेश्राम

रिलायंस फाऊंडेशन व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकाचे व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि. ०६ जुलै २०२१ रोजी करण्यात आले.
या ऑडिओ कॉन्फरन्स मध्ये डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे सहाय्यक प्राध्यापक मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र तथा कनिष्ठ मृद शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ यांनी कपाशी आणि सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे , 
पिकाला १७ प्रकारच्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते आणि अन्नद्रव्य योग्यवेळी आणि योग्य प्रमाणामध्ये पिकाला देणे आवश्यक असते, नत्र,स्पुरत, पालाश हे मुख्य अन्नद्रव्य आहे सोबत बाकीचे पण अन्नद्रव्य पिकाला आवश्यक आहे हे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगितले तसेच बाळाला आईच्या दुधाची जेवढी आवश्यकता असते तेवढीच पिकाला सेंद्रिय खताची आवश्यकता असते खताचे प्रमाण तसेच वेगवेगळी खते याविषयी उत्तम असे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. पंजाबराव कृषी विदयापीठ अकोलाचे प्रो.राजेंद्र जाणे यांनी कीडरोग व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क आवश्यक आहे आणि कीडरोगासाठी कोणत्या फवारण्या आवश्यक आहे हे शेतकऱ्यांना सांगितले या कार्यक्रमांमध्ये  
यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी तज्ज्ञांना सोयाबीन आणि कपाशी पिकावरील कीडरोग ,खत व्यवस्थापन याविषयी विविध प्रश्न विचारले तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तम प्रकारे समाधान केले अश्या पद्धतीने कार्यक्रम उपयुक्त झाला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies