२६वर्षीय युवकाची गळाफास घेवुन आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील घटना
तालुका प्रतिनिधि / पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील २६ वर्षीय युवकाने पेंढरी शिवारात लक्ष्मण कुमरे यांच्या शेतामध्ये असलेल्या झाडाला गळाफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. गळाफास घेणाऱ्या युवकाचे नाव मंगल शामराव कुमरे असुन
मंगल हा आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे कुटुंबातील सदस्य कडून सांगितले मंगल हा काल पासून बेपत्ता असल्याने आज दि. ८ जुन रोजी सकाळच्या सुमारास मंगल यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत शेतकरी शेतामध्ये गेले असता त्यांना दिसून आल्याने ही घटना उघडकीस आली.