Type Here to Get Search Results !

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने केले रद्द …

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने केले रद्द …


 अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. न्यायमूर्ती बिश्त आणि धनुका यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. राणा यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक जिंकली होती.
मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रा विरोधात शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ उच्च न्यायालयात  याचिका दाखल होते.अडसूळांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला. त्यामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समिती समोर देखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.
खासदार नवनीत राणा यांनी जात पडताळणी समिती समोर दाखल केलेली मूळ कागदपत्रे सादर करण्याची मागणी यचिकाकर्त्यांनी केली होती. याचिकाकर्त्यांनी केलेली विनंती उच्च न्यायालयाने मान्य केली होती. मूळ कागदपत्रे पुढील सुनावणीपर्यंत सादर करण्याचा आदेश न्यायालयाने नवनीत राणा यांना दिला होता.
 या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने राणा याचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला. न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राणा यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies