कोरोना अपडेट....
मारेगाव तालुक्यात दोन पॉझिटीव्ह
- मारेगाव शहर शुन्य
मारेगाव : दीपक डोहणे
मारेगाव तालुक्याला पुन्हा कोरोनाने पाय पसरण्याची क्रिया केली आहे.काल बुधवारला एकही रुग्ण नसतांना तालुक्यातील ग्रामिण भागात आज गुरुवारला दोघांना बाधीत केले.यातुन मारेगावची सुटका करित शहराला कोरोना संसर्गाने भोपळा दिला.
मारेगाव तालुक्यातील पॉझिटीव्ह आकड्याचा आलेख चढ उतार होतांना दिसते आहे.मात्र कोरोना संसर्गाचा दर शून्यावर आल्याने नागरिकासह प्रशासनाने तुर्तास सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मारेगाव शहराला कोरोना संसर्गाने आज वजा केले असले तरी तालुक्यातील शिवणी व सराटी येथील प्रत्येकी एकास बाधीत केले.त्यामुळे नागरिकांनी अजुनही सतर्कता बाळगण्याची नितांत गरज बनली आहे.
दरम्यान मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गजन्य रुग्णांच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.त्यामुळे अवघ्या दिवसात मारेगाव तालुक्याची कोरोना मुक्तीची घौडदौड दिसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आज गुरुवारला तालुक्यात दोन बाधीत असले तरी बरे होण्याचे प्रमाण ०५ आहे तर अँक्टिव संख्येचा आजही दुहेरी आकडा घेत ६१ वर आहे.