३६ वर्षीय युवकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग
वणी शहरातील घटना
वणी शहरातील खडबडा मोहल्ला येथे राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी व आईने वणी पोलीस स्टेशनला दिली या प्रकरणी वणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून त्याच्यावर पोस्को व विनयभंग अंतर्गत गुन्हे दाखल केला आहे. खडबडा मोहल्ला येथील घरा शेजारी राहणारा संशयित आरोपी सिद्धार्थ जनार्धन गायकवाड (३६) . यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बाथरुम मध्ये आंघोळी करिता गेली की, संशयित आरोपी हा चोरून लपून तिला बघायचा. आरोपी हा नेहमी तिला आंघोळ करतांना पाहत असल्याचे मुलीच्या लक्षात येताच तिने हा प्रकार आईला सांगितला. १ जूनला दुपारी २ वाजता मुलगी आंघोळी करिता गेली असता आरोपी तिच्याकडे लपून बघत असल्याचे आईच्या लक्षात आले. परत २ जूनलाही मुलगी आंघोळ करण्यास गेली असता संशयित आरोपी अल्पवयीन मुलीला चोरून बघत असल्याचे आई व वडीलांच्या लक्षात येताच मुलीच्या पालकांनी मुलीला घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले. खडबडा मोहल्ला येथे राहणारा सिद्धार्थ जनार्धन गायकवाड (३६) हा मुलगी आंघोळ करित असतांना चोरून बघत असल्याची तक्रार दाखल होता पोलीसांनी संशयित आरोपी जनार्धन गायकवाड याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३५४, ३२३, ५०४ व सहकलम १२ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करीत आहे.