निकाल लागत नसल्याने नैराश्य, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
तरुणाने गळफास घेण्यापूर्वी मित्र, नातेवाइकांना केले फोन
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील स.भु. कॉलनीत परमेश्वर राहणाऱ्या बाबूराव चव्हाण याने दुपारच्या वेळी राहत्या घरा मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली. बाबुरावने स्पर्धा परीक्षेचे पेपर दिले असल्याने निकाल लागत नसल्याने जवळच्या मित्र, नातेवाइकांना फोन करून जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांना घेऊन कुटुंबातील सदस्य खोलीवर पोहोचले असता त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता.
आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाइड नोट लिहून ठेवली. त्यात काही मित्रांची नावे आहेत. या मित्रांना मी गेल्याचे कळवा. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नका, असे म्हटले आहे. याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस नाईक आर. एस. तांदळे पुढील तपास करीत आहेत