विद्युत तारेच्या प्रवाहाच्या धक्क्याने २ शेळ्या जागीच ठार
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाराज
वर्धा तालुक्यातील येसंबा येथी रहिवासी सुनील लक्षमराव धापूलक, यांचा व्यवसाय शेळीपालनाचा असून रमेश हुके यांच्या शेतात मध्ये चारण्यासाठी गेले असता तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्यात१ शेळी व १ बोकड जागीच ठार झाले असुन अंदाजे किंमत २५ हजार रुपये असून सुनील धापूलकर यांना पण विद्युत तारेचा झटका बसल्याने जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले असुन या विद्युत तारेची तक्रार २ महिन्या आधी विद्युत विभाग यांच्या कडे केली असल्याने, तरी ही कुंभकर्णी विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष करून दोन मुक्या जनावराचा मृत्यू झाला असुन विद्युत विभागाने तत्काळ नुकसानभरपाई शेळी पालकांना देवून तुटलेले तार व्यवस्थित करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे.