शिरपूर येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्ष लावून विनम्र अभिवादन करण्यात आले।
शिरपूर :क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त ९ जुन रोजी शिरपूर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला हार अर्पण करून वृक्ष लावून विनम्र अभिवादन करण्यात आले. आले.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे व राजे फाउंडेशन तालुका पदाधिकारी यावेळी शिरपूर तालुका प्रसिद्ध प्रमुख दिलीप पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेत इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते.
शिरपुर तालुका व रावण राजे फाउंडेशन शिरपुर तालुका चे पदाधिकारी उपस्थित होते,
सिवदास भिल (सरपंच पनाखेड),दिनेश पावरा (पोलिस पाटिल-पनाखेड)
चविण पावरा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिरपुर ता युवा अध्यक्ष,अमर पावरा रावण राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शिरपुर ता अध्यक्ष
,मंगलसिंग पावरा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शिरपुर ता प्रसिद्ध प्रमुख,
दिलीप पावरा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पनाखेड शाखा सचिव,
राकेश पावरा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पनाखेड शाखा संपर्क प्रमुख
अशोक पावरा (ग्रामपंचायत ऑपरेटर पनाखेड),
राहुल पावरा, ईनेश पावरा (वनरक्षक),
सुनिल पावरा सदस्य, शिवम पावरा, सदस्य, अजय पावरा, सदस्य,शुभम पावरा, सदस्य,
इत्यादी उपस्थित होते...
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झारखंड येथील उलहातू येथे झाला.बिरसा मुंडा यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने १८९५ मध्ये छोटा नागपूर येथे इंग्रजां विरोधात मोठा लढा सुरू केला.इंग्रजांनी त्यांना पकडले व तुरूंगात टाकले. इंग्रजांनी बिरसा मुंडा यांचा खूप छळ केला. ९जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची येथील तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत समजले जाते. जननायक ही पदवी लोकांनी त्यांना बहाल केली. जननायक बिरसा मुंडा,भगवान बिरसा मुंडा,क्रांतीसूर्य बिरसा मुंडा,धरतीआबा इत्यादी नावाने लोक त्यांना ओळखू लागले. बिरसा मुंडा यांचे कार्य देशासाठी व आदिवासी समाजासाठी प्रेरणा दायी होते. आदिवासी समाज त्यांचा आदर्श घेऊन कार्य करत असतो. याचा आम्हाला अभिमान वाटतो.बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला आदिवासी समाजात क्रांतीकारी कार्य करायचे आहे.
भगवान बिरसा मुंडा की जय! बिरसा मुंडा अमर रहे! इत्यादी घोषणा यावेळी देण्यात आल्या.