कुंभा येथील शेतकऱ्याची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या
कुंभा : सुरज झोटिंग
तालुक्यातील कुंभा येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेवुन जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.०९ जुन रोजी संध्याकाळी सात वाजताचे दरम्यान घडली.
प्रविण सुनिल कुमरे (३२) असे शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्याचे नाव असून मागील काही दिवसापासून आर्थिक विवंचनात असल्याने.घरा शेजारी असलेल्या सार्वजनिक विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केली.
प्रविण कुमरे याच्या पश्चात आई,वडील , पत्नी दोन विवाहित बहिणी ,व दोन वर्षीय मुलगा आहे. या घटनेचा सांयकाळी घटनास्थळावर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करिता मारेगाव ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.