खळबळ...
मारेगाव तालुक्यात ५० लाखाचा रेती साठा जप्त!
- गोरज येथील घटना
- यवतमाळ येथील विशेष पोलिस पथकाची कारवाई
मारेगाव : दिपक डोहणे
तालुक्यातील गोरज येथील एका शेतात रेतीच्या साठ्यावर छापा टाकीत किमान ५० लाख रुपयाचा रेतीसाठा जप्त केल्याची कारवाई दि.८ जुन रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आल्याने पुरती खळबळ माजली आहे.सदर कारवाई यवतमाळ येथील विशेष पोलिस पथकाने केली आहे.
तालुक्यातील गोरज येथील जिवतोडे यांच्या शेतात जवळपास ४०० ट्रक असलेल्या ३ हजार ब्रॉस किंमत ५० लाख रुपये किमतीच्या वाळूसाठा होता.याची कुणकून यवतमाळ येथील पोलिस अधिक्षक यांना लागली त्यानूसार पोलिस पथक नेमून छापा टाकण्यात आला.या कारवाईत ५० लाख रुपयांचा ३ हजार ब्रॉस रेती साठा जप्त करित मारेगाव तहसिल प्रशासनकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.परिणामी , मारेगाव तालुक्यात यापूर्वी मार्डी येथील अवैद्य दारू दुकानावर व आता गोरज येथील रेती साठ्यावर सर्वात मोठी कारवाई यवतमाळ येथील विशेष पोलिस पथका करवी करण्यात आल्याने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.