Type Here to Get Search Results !

कुंभा येथील युवकाची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या

कुंभा येथील युवकाची विहिरीत उडी घेवुन आत्महत्या 
     मारेगाव : दिपक डोहणे
      तालुक्यातील कुंभा येथील युवकाने विहिरीत उडी घेवुन जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.०९ जुन रोजी संध्याकाळी सात वाजताचे दरम्यान घडली.
     प्रविण सुनिल कुमरे (३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून मागील अनेक दिवसापासून त्याला व्यसनाने ग्रासले होते.घटनेच्या दिवशी कुटुंबासोबत शाब्दिक खडाजंगी करित त्याने टाकळी रोड वरील सरकारी विहिरीत उडी घेवुन गतप्राण झाला.
       प्रविण कुमरे याच्या पश्चात आई,वडील ,दोन बहिणी ,पत्नी व दोन वर्षीय मुलगा आहे.दरम्यान घटनास्थळावर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करिता मारेगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies