गांजाची वाहतूक करणाऱ्या महिलेस अटक
बल्लारपूर पोलिसांना गांजाची वाहतूक एका वाईट फोर व्हीलर मधून होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे बल्लारपूर राजुरा- बामणी मार्गावर नाकाबंदी करण्यात आली फोर व्हीलर क्रमांक एम एच ३४ए.ए.५६०७या गाडीची थांबून तपासणी केली असता फोर व्हिलर वाहनात २५.१४४ किलो ग्राम गांजा आढळून आला या गांज्याची एकुण २लाख ५१हजार ४४०रूपये किमत असुन फोर व्हिलर वाहना सहित ४लाख ५१हजार ४४० एकुण मुद्दे माल जप्त करण्यात आला
या गांजाची वाहतूक करणाऱ्या मध्ये ५५वर्षीय महिला चंदाबाई झाडे बंगाली कँम्प, माधव मामीड३३वर्षीय युवक रा. हिंगणघाट व राहुल गुळघाने रा.बल्लारपूर यांना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली असून ही कारवाई विलास गायकवाड, रमिझ मुलाणी, चेतन टेभुरने रणविजय ठाकूर, आनंद परचाके, शरद कुडे ,बाबा नैताम दिलीप आदे या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली