Type Here to Get Search Results !

मारेगाव काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढी विरोधात धरणे आंदोलन

मारेगाव काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल व  गॅस दरवाढी विरोधात धरणे आंदोलन 

केंद्र शासनाने दरवाढ मागे घेण्याची  मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे

            प्रतिनिधी
मारेगाव वार्ता/ पंकज नेहारे 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देशानुसार, केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस दरांमध्ये केलेल्या अवास्तव दरवाढीचा निषेध करण्याकरिता संपूर्ण राज्यात आज दि. ७जुन रोजी मारेगाव काँग्रेसच्या वतीने नरेंद्र पाटील ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात समोर  निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली.
जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांनी प्रास्ताविक भाषणात पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन दरवाढ करून जनतेच्या पैशावर डल्ला मारत आहे. प्रधानमंत्री यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस तर्फे करण्यात आली. दरवाढ कमी करण्यासाठी तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, जिल्हा परिषद सदस्य अरूणा खंडाळकर,पंचायत समिती सभापती शितलताई पोटे, मारेगाव काँग्रेस मारेगाव शहर अध्यक्ष शंकरराव मडावी, युवक काँग्रेस मारेगाव शहर अध्यक्ष आकाश बदकी यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies