Type Here to Get Search Results !

१० हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा उद्योग अधिकाऱ्याला अटक

१० हजार रुपयाची लाच घेताना जिल्हा उद्योग अधिकाऱ्याला अटक

जळगाव प्रतिनिधी । कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी लाभार्थ्यांकडून १० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा उद्योजग केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर यांना आज दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार हा सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी PMEGP या शासनाच्या योजने अंतर्गत कर्ज व सबसिडी योजनेचा लाभ मिळुन देण्यासाठी तक्रारदार यांचे प्रकरण अपलोड करून  बँकेस पाठविण्यासाठी संशायित आरोपी आनंद विद्यासागर   यांनी तक्रारदार यांचेकडे साक्षीदार सहित दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.  याप्रकरणी तक्रारदार यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपी आनंद विद्यागर  यांनी लाच स्वीकारलेली रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.ही कारवाई
सतीश डी.भामरे, ( पोलीस उप अधीक्षक),  यांनीं हा सापळा रचण्यासाठी मार्गदर्शन केले  सापळा पथकात पो नि संजोग बच्छाव, स फौ. दिनेशसिंग पाटील, पो हे कॉ. अशोक अहीरे, पो हे कॉ. सुनिल पाटील, पो हे कॉ. रविंद्र घुगे, पो ना. मनोज जोशी, पो ना. सुनिल शिरसाठ, पो ना. जनार्धन चौधरी, पो कॉ. नासिर देशमुख, पो कॉ. ईश्वर धनगर, पो कॉ. प्रदिप पोळ, पो काॅ. महेश सोमवंशी यांचा यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies