महागाई कमी करता येत नसेल तर खुर्ची खाली करा- बहुजन मुक्ती पार्टी
नेर लक्ष्मण वानखडे
महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात व अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांत केन्द्र सरकारच्या महागाई विरोधात यल्गार आंदोलन
२०१४ मध्ये महागाई विरोधात आंदोलन करुण केन्द्रात आलेले मोदी सरकार (भाजपा) हे मोठे व्यापारी व उद्योगपती यांचे समर्थक सरकार असुन गोर गरीब, कामगार, शेतकरी, कष्टकरी शेतमजूराच्या सामान्य नागरिकांच्या विरोधातील सरकार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवरील पेट्रोल व डिझेलचे भाव कमी असुन सुद्धा
केन्द्र सरकारने भारतीय बाजारपेठेत उच्च किंमतीत विकुन भारतीय नागरिकांची आर्थिक पिळवणूक चालविलेली आहे. पुर्वी गॅस सबसिडीवर मिळत असताना आता सबसिडी बंद करून गॅसची किंमत ९३० रुपये प्रति सिलेंडर करून गॅसची घनता ( थिकनेस) कमी करुन लोकांची दोन्ही बाजूला फसवणूक करून केन्द्र सरकार भारतीय जनतेची आर्थिक लुट करित आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या असुन कोरोना काळातील लॉकडाऊन मुळे नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. खाद्य तेलाच्या,किरणा मालाच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने भारतीय स्त्रियांचे घरगुती आर्थिक बजट पूर्णपणे कोसळले आहे. बियाणे,खते कीडनाशके यांचें दुप्पटीने भाव वाढले आहे. विज बिल महागले आहे.
भारतीय जनता महागाईच्या भस्मासुरात होरपळत असतानाही केन्द्र सरकारची महागाई बाबतची भुमिका निष्क्रिय असुन भारतीय जनतेला लुबाडून आर्थिक संकटात लोटणारी आहे. महागाई कमी करण्यांत यावी यासाठी नेर तहसीलवर बहुजन मुक्ती पार्टी तर्फे नायब तहसीलदार नरेंद्र थोटे यांना निवेदन देण्यात आले असू नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारच्या या महागाईच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी द्वारे कलेक्टर व तहसील कचेरी वर १ दिवसीय टैक्सी, रिक्षा, मोटर सायकल धक्का मारो आंदोलन आज करण्यात आले यावेळी तालुका बहुजन मुक्ती पार्टीचे नेर तालुका अध्यक्ष डॉ अशोक खोब्रागडे, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी अध्यक्ष विशाल गोंडाणे, सुनील गवई, प्रविण रंगारी, दिवाकर मनवर, वासुदेव शेंडे, अरविंद पाटील, प्रमोद गायकवाड, गौतम खंडारे,संजय खोब्रागडे, राजेंद्र मडावी उपस्थित होते.