दारव्हा शहरातिल पवन शेबे नामक युवकाने वाढदिवस साजरा न करता केली कोरोना लसिकरण जनजागृती
दारव्हा प्रतिनिधी /
सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असुन नागरीकांनी लसिकरण करुन घेण्यासाठी प्रशासनाकडुन वारवांर आवाहन करण्यात येत आहे. पंरतु असे असतांना काहीजण अजुनही कोरोना लसिकरणाचा बाहु करुन लसिकरणाबाबत भिती मनात असल्याने लसिकरण करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडुन घरोघरी जावुन जनजागृतीसोबतच लसिकरणाबाबत कुटूंबातिल व्यक्तींची माहीती घेण्याचे काम सुरु असतांना सामाजीक भान ठेवत दारव्हा शहरातिल अंबीका नगर येथील युवक पवन शेबे यांनी आज सोमवार दि. १४
जुनला त्याचा वाढदिवसाचा खर्च कोरोना लसिकरण जनजागृती रथावर खर्च करुन दारव्हा तालुक्यासह शहरातुन कोरोना लसिकरणाबाबत जनजागृती केली. सामाजीक भान जपत आपणही समाजाचे देणे लागतो हा उद्दात हेतू ठेवत वाढदिवसावर होणार वायफळ खर्च सत्कारणी लागावा या उद्देशाने कोरोना जनजागृती रथ तयार करुन ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातुन कोरोना लकिसरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
व्हाटसअप,पेसबुकच्या जमान्यात युवा पिढी तासनतास सोशियल मिडीयामध्ये गुरपूâटली असुन वाढदिवसांवर मोठया प्रमाणात खर्च करुन सोशियल मिडीयावर फोटो प्रसीध्द करणाऱ्या युवकांना ही मोठी चपराक आहे. युवा उद्योजक असलेले पवन शेबे यांच्या या स्तुत्य उपक्रमाची आज सोमवारला दिवसभर शहरात मोठी चर्चा सुरु असुन त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.