यवतमाळ जिल्ह्यातील उमेद प्रकल्पातील महिलांना खरीप हंगामातील पिकाविषयी खत व कीडरोग व्यवस्थापन या विषयावर ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन
सचिन मेश्राम
रिलायंस फाऊंडेशन व उमेद प्रकल्प यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक शनिवारी दि.२६ जून रोजी खरीप हंगामातील पिकाविषयी खत व कीडरोग व्यवस्थापन या विषयावर ऑडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या ऑडिओ कॉन्फरन्समध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध गावामधील उमेद प्रकल्पातील महिलांनी सहभाग घेतला खरीप हंगामातील पिकाचे खत व्यवस्थापन , कीडरोग व्यवस्थापन,निंबोळी अर्क कसा तयार करायचा यासारखे विविध प्रश्न तज्ञांना विचारले आणि ऑडिओ कॉन्फरन्समध्ये महिलांनी सहभाग घेतला त्या महिलांच्या सर्व प्रश्नाचे उत्तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे प्रो. राजेंद्र जाणे यांनी दिले आणि महिलांना शेती करण्यास प्रोत्साहन केले महिलांचा शेती करण्यासाठीचा उत्साह बघून तज्ञ पण खुश झाले अश्याप्रकारे कार्यक्रम उपयुक्त झाला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे प्रफुल बन्सोड प्रकल्प व्यवस्थापक तसेच कार्यक्रम सहायक मनीष मेश्राम यांनी केले.