Type Here to Get Search Results !

प्रयास वन येथे वसुंधरा फाउंडेशन व निस्वार्थ सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व श्रमदान

प्रयास वन येथे वसुंधरा फाउंडेशन व निस्वार्थ सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व श्रमदान 

      सचिन मेश्राम

यवतमाळ दि.२७ जुन-: येथील गोधणी रोड स्थित प्रयास वनची निर्मीती करण्यात आली असुन प्रयास संस्थेच्या माध्यमातून यवतमाळकरांसाठी एक उत्तम उद्यान तयार होत आहे.जर पर्यावरणाचे संतुलन टिकवायचे असेल तर २० टक्के असलेले वन क्षेत्र ३० टक्के नेण्याची गरज आहे.यासाठी वसुंधरा फाउंडेशन व निस्वार्थ सेवा फाउंडेशन यांच्या वतिने त्या प्रयास वन येथे वृक्षारोपण व श्रमदान
करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.विशेष म्हणजे या ठिकाणी एक प्रतिज्ञा घेण्यात आली कि, 'झाडे लावा,झाडे जगवा,एक व्यक्ती एक झाड' हा संकल्प घेऊन वृक्षारोपण करण्यात आले.जीवनात वृक्ष लागवड व संवर्धनाचा संस्कार विध्यार्थ्यांना मिळाल्यामुळे भविष्यात वृक्ष लागवड व संवर्धनचे काम शेवटच्या घटकापर्यंत निश्चित पोहचेल असा विश्वास वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ वर्षा पडवे यांनी व्यक्त केला,यांच्या सह प्रतिभा मुळे,किरण शिरभाते,सौ.स्मिता ढेकळे,सौ.संगिता पुरी,सौ.योगिता मासाळ,सौ.नंदा बुरांडे,सौ.निर्मला आडे,सौ.रेणुका जोहरे तसेच निस्वार्थ सेवा फाऊंडेशनचे संकेत लांबट,कमलेश बघेल,प्रविण इंजाळकर,अर्पित शेरेकर,परशुराम कडु,निलेश कळसकर,अनिकेत नवरे,प्रदीप बोचरे,सृष्ठी मेश्राम,विशाखा गजभिये इत्यादी या वृक्ष लागवडीत सहभागी झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies