Type Here to Get Search Results !

कुलरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू -वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील घटना

कुलरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू 

-राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील घटना

     प्रतिनिध/राळेगाव

राळेगाव : वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथील एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा कुलरला करंट लागुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि २७ जुन रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान घडली.मन सुन्न करणाऱ्या या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहेत.
सौरभ रंजित भोसले ६ वर्ष  रा.पारधी बेडा दहेगांव ता.राळेगांव असे त्या चिमुकल्याचे नाव असून घटनेच्या वेळी आई वडील व बहिण हे सर्व जण शेतात कामाला गेले होते.दरम्यान तो घरी एकटाच असल्याने सकाळी नऊ वाजता दरम्यान जेवन आटोपल्यानंतर कुलरच्या बाजुला असलेल्या स्टिलच्या
गुंडातून पाणी घेत असताना कुलरचा जोराचा करंट लागला.दरम्यान या घटनेची माहिती शेजाऱ्यांना कळताच त्याला तातडीने उमरी येथील रुग्णालयात भर्ती केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेने : तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात
असुन दोन वर्षांपूर्वी सुद्धा तालुक्यातील कोदुर्ली श्रीरामपूर येथे अशीच घटना  घडली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies