शेतकरी सुरेश मुडे यांना धडक सिंचन योजनेचे पैसे तात्काळ द्या लक्षवेध आंदोलन करून प्रहार जनशक्ती संघटनेची मागणी
वर्धा जिल्ह्यातील पडेगाव या खेडेगावातील शेतकरी सुरेश सदाशिव मुडे रा. पडेगाव या शेतकऱ्यांने मागील १ मे २०२० मध्ये धडक सिंचन योजना खंडित होती ती मिळावी या करिता ते वर्धा पंचायत समितीला पाठपुरावा करत करत आता २०२१ ला एक वर्षे पूर्ण झाले पण ही धडक सिंचन योजनेेेचे अनुुुदानन न मिळाल्याने सिंचन विहीर बनवण्यासाठी त्यांच्यावर आतापर्यंत हात उसने घेतलेले३ लाख रुपयांचे कर्ज द्यायचे आहे.
तर कसे द्यायचे हे सुचेनासे झाले ते इतके हतबल झाले सरतेशेवटी त्या शेतकऱ्यांना आत्मदान केल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही म्हणून त्यांनी व्यथा गावातील प्रहार जनशक्ती पक्ष पडेगाव अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांनी आपले आपली परििस्थिती सांगितली त्वरित त्यांनी निर्णय घेतला व आज दि.११जुुुन पासून विहिरी मध्ये सकाळी ७ वाजतापासून लक्षवेधक आंदोलन सुरू केले जोपर्यंत शेतकऱ्याला धडक सिंचन योजनेचे पैसे मिळनार नाही तोपर्यंत आम्ही सर्व आंदोलन सुरू ठेवु असे सर्व कार्यकर्ते यांनी ठाम निर्णय घेतला याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष पडेगाव अध्यक्ष मंगेश मुडे,दिनेश घायवट,अमोल तडस,धीरज कामडी, गिरीश वैद्य,दिनेश कानेटकर,सुरेशराव मुडे,सरपंच अनंतराव हटवार,प्रहार चे देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्ष राजेशजी सावरकर ,नावेद पठाण,महेंद्र डंभारे,मुकेश वाघमारे त्याचप्रमाणे पडेगाव मधील शेतकरी व मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित होते.