Type Here to Get Search Results !

कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन महिला जागीच ठार

कार चालकाचे वाहनावरील  नियंत्रण  सुटल्याने तीन महिला जागीच ठार


नागपूर: दुचाकी चालकास वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  कार  पुलाच्या सुरक्षा भिंतीवर आदळल्याने . यात कारचे अक्षरश:कारचे दोन भाग होऊन  कारमधील  बसुन असलेल्या तीन महिला जागीच ठार  असुन  कारचालक व एक महिला गंभीर जखमी असुन त्यांना नागपूर वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामध्ये एक महिला कळमेश्वर शहरातील रहिवासी आहे. हा भीषण अपघात नागपूर-छिंदवाडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४७ वरील सौंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) जवळ शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडला.
मृतांमध्ये प्रिया सचिन जयस्वाल (३२, रा. कळमेश्वर), रोशनी अनूप जयस्वाल (३०) व माधुरी अंगद जयस्वाल (३६) दोघीही रा. सौसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश या तिघींचा समावेश असून, संचित प्रेम जयस्वाल व नीलम संचित जयस्वाल (३२) दाेघेही रा. नागपूर अशी जखमींची नावे आहेत. जयस्वाल यांच्या नातेवाईकाने रामाकाेना (मध्य प्रदेश) येथे शुक्रवारी रात्री लग्न असल्याने हे सर्व जण लग्नात सहभागी हाेण्यासाठी जात  होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies