वटफळा येथे ४० वर्षीय महिलेची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
नेर तालुक्यातील घटना
नेर तालुका प्रतिनिधी
लक्ष्मण वानखडे
नेर तालुक्यातील वटफळा येथे शेतकरी देविदास राजाराम शेंडे वय ५० वर्ष व पत्नी ज्योती शेंडे हे दोघेही शेती व्यवसाय करुन आपल्या परिवाराचा गाडा चालवत असताना व सततची नापिकी व कोवीड १९ वाढत्या प्रादुर्भावने अनेकाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत असुन अत्यावश्यक किराणा वस्तूचे भाव गगनाला भिडले असुन शेतकरी व शेतमजूर गोरं गरीब जनतेचे कंबरडे मोडले आहेत अशा परिस्थितीत परिवारांचे पालनपोषण करणे फार अवघड झाले असुन . यवतमाळ जिल्हात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे.
शेती करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असताना नेर तालुक्यातील ज्योती देविदास शेंडे वय ४० वर्ष यांनी मंगळवार दिनांक १५जुन रोजी पहाटे ४ वाजता सुमारास मौजा मांडवगड येथील देवनाथ वाडेकर यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ज्योती देविदास शेंडे ही शेतीच्या बिमारीला घेतलेल्या कर्जामुळे मानसिक त्रस्त असल्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे नातेवाईका कडुन सांगण्यात आले असुन ज्योतीच्या पश्चात पती तिनं मुलें असा परिवार आहे.