निधन वार्ता....
........................
सगणापुर येथील चरणदास जिवने यांचे निधन
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील बुद्ध विहार कमिटीचे माजी अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते चरणदास जिवने यांचे आज दिनांक २ जुन रोजी सकाळी ०९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते.
आयुष्यमान चरणदास चोखाजी जिवने हे मागील आठवड्यापासुन किरकोळ आजारी होते.प्राथमिक स्वरुपाचे उपचार वणी येथे करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली नाही.पुढील उपचारार्थ त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सगणापुर येथील बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्षापर्यंत पदभार सांभाळला.धार्मिक व सामाजीक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा.आंबेडकरी चळवळीचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
दरम्यान मागील आठवड्यापासुन प्रकृती बिघडल्याने आज त्यांची प्राणज्योत मालविली.त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,दोन मुले,एक मुलगी,दोन भाऊ व एक बहीण आणी नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
सगणापुर येथील स्मशानभूमीत त्यांचेवर आज बुधवारला सायंकाळी ६ वाजताचे दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.