करजगांव वासीयांचे महावितरण कंपनीला निवेदन
समस्या निकाली न काढल्यास आंदोलनाचा इशारा
परतवाडा:-प्रतिनिधी
परतवाडा येथून जवळच असलेल्या करजगांव येथील नागरिक मागिल सहा महिन्या पासून विजेच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत त्यामुळे करजगांव येथील योगेश पवार यांनी करजगांव वासीयांतर्फे महावितरण कंपनीला निवेदन दिले.
योगेश पवार यांनी निवेदनात असे नमुद केले आहे की मागिल सहा महिन्या पासून करजगांव येथील विज सतत ये-जा करत असते कधी पांच मिनटांसाठी तर कधी दिवसांतून दोन दोन विज बंद असते.या कारणांमुळे करजगांव वासी त्रस्त झाले आहेत वया समस्येचा दहा बारा दिवसांत तोडगा न काढल्यास तिकरितव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
निवेदन देते वेळी योगेश पवार यांच्या सह रामदास भोजने, सुशांत कारंजकर,दिनेश राहटे,सतिश वगारेकर,पंकज आगलावे, सुशांत कविटकर,रोशन मालधुरे, नितीन कांडलकर, कुलदीप हाडोळे, वैभव बेलसरे सह करजगांव ग्रामवासी उपस्थित होते.